Video | सारंगखेडा घोडेबाजारात थंडी बाधू नये म्हणून घोड्यांची घेतली जाते विशेष काळजी

| Updated on: Dec 29, 2023 | 9:19 PM

सारंगखेडा यात्रेत ( चेतक फेस्टीव्हल ) तीन हजारांहून अधिक घोडे दाखल झाले आहे. हा घोडेबाजार तापी नदीच्या किनारी असल्याने येथे प्रचंड थंडी पडली आहे. त्यामुळे माणसाची जशी केली जाते. तशीच घोड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. रात्रीच्या वेळी घोड्यांच्या देखभालीसाठी खास माणसे तैनात केली आहेत. माणसांना जसे गरम उबदार कपडे घातले जातात. तसेच घोड्यांनाही गरम कापडाची झुल पांघरली जात आहे. त्यामुळे थंडीमुळे बचाव होण्यास मदत होत आहे.

नंदूरबार | 28 डिसेंबर 2023 : सारंगखेडा घोड्यांचा बाजार जगभरात प्रसिद्ध आहे. यंदा या बाजारात तीन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी आले आहेत. परंतू वाढत्या थंडीचा या मुक्या प्राण्यांना होत आहे. तापी नदीच्या किनारी हा बाजार भरत असल्याने घोड्यांना थंडीचा बाधा होऊ नये म्हणून विषेश काळजी घेतली जात आहे. हिवाळ्यात घोड्यांना थंडी वाजू नये यासाठी मसाल्यांचा खुराकही दिला जात आहे. या देशी मसाल्यामुळे त्यांना उब मिळते. या घोड्यांच्या देखभालीसाठी खास रात्रपाळीत कामगार नेमण्यात येत आहेत. या घोड्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांना गरम कापडाची झुळ अंगावर पांघरली जाते. घोड्यांना चणे, चण्यांची चुनी, मका, बाजरी असा खुराक दिला जात आहे. या घोड्यांना सकाळी थंडी असल्याने उन्हं पडल्यानंतर रायडींगसाठी बाहेर काढले जात असल्याचे घोड्यांचे मालकांनी म्हटले आहे. घोड्यांचे लसीकरण देखील केले जात आहे. त्यामुळे घोड्यांची अगदी माणसांप्रमाणे केली जात आहे.

Published on: Dec 28, 2023 03:22 PM
जरांगे पाटलांना हे सरकार खेळवतंय, एकनाथ खडसे यांनी केला आरोप
Video | सारंगखेडा चेतक फेस्टीव्हलमध्ये घोड्यांच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन