Video | 22 जानेवारीला घराघरात श्रीराम ज्योत लावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आवाहन

| Updated on: Dec 30, 2023 | 4:19 PM

अयोध्येतील प्रभू रामलल्ला विराजमान होण्याचा ऐतिहासिक आपल्या नशिबात आला हे मोठे भाग्य आहे. या 22 जानेवारीला देशभरातील घराघरात राम ज्योती लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. आणि सर्वांनाच या कार्यक्रमाला उपस्थित रहाणे शक्य नसल्याने आपआपल्या सवडीने 23 जानेवारीपासून रामाचे दर्शन घ्यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

अयोध्या | 30 डिसेंबर 2023 : राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक क्षण मोठ्या भाग्याने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. आम्हाला देशासाठी नवसंकल्प करायला हवा, स्वत:ला नव्या उर्जेने भरायला हवे. या पवित्र भूमितून देशाच्या 140 कोटी जनतेला हात जोडून विनंती करीत आहे की येत्या 22 जानेवारीला भारताच्या घराघरात सायंकाळी ‘राम ज्योत’ लावून दिवाळी साजरी करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून केले आहे. सर्वांना या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायचे असले तरी साडे पाचशे वर्षे वाट पाहीली आता आणखी थोडी कळ सोसा आणि आपआपल्या सवडीनूसार 23 जानेवारीनंतरच रामलल्लाचे दर्शन घ्या असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अयोध्येला भारताचे सर्वात स्वच्छ शहर करण्याचा संकल्प करा, 14 जानेवारी मकरसंक्राती ते 22 जानेवारीपर्यंत देशातील सर्व तीर्थस्थळांची स्वच्छता करण्याचे मोहीम राबविण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.

Published on: Dec 30, 2023 04:18 PM