Video | ‘कारखान्यातून रसद पुरविली ?’ काय म्हणाले राजेश टोपे

| Updated on: Feb 27, 2024 | 8:19 PM

खरं तर अशा सामाजिक विषयासाठी एसआयटी चौकशी व्हायला नको, परंतू जर होत असेल तर दूध का दूध ? पाणी का पाणी साफ होईल असेही राष्ट्रवादी आमदार, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. धनगर समाजाच्या आंदोलकांसाठी देखील आपण अशाच प्रकारे अल्पोहार आणि पाण्याचे स्टॉल लोकप्रतिनिधी या नात्याने लावल्याचे टोपे यांनी सांगितले.

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील त्यांच्या ‘शिवबा’ या संघटनेमार्फत गेली अनेक वर्षे मराठा मुलांच्या भविष्याकरीता काम करीत आले आहेत. मराठा समाजाच्या या आंदोलनाला आपला पाठींबा असला तरी वाईट मार्गाने ते चालविण्यास कोणीही मान्यता देणार नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आपण ज्यावेळी जालनाचे पालक मंत्री होतो. तेव्हाही मनोज जरांगे यांचे साखळी उपोषण आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी त्यांनी 105 दिवसांचे उपोषण केले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी देखील आपण जरांगेंची भेट घालून दिली होती. मराठा आरक्षणासाठी ते नेहमीच आग्रही होते. त्यामुळे कोण सत्तेत होते. यांच्याशी त्यांना काही फरक पडत नव्हता. ते ध्यैय घेऊन काम करीत होते असेही टोपे यांनी सांगितले. त्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नसल्याचे जरांगे यांनी देखील स्पष्ट केले आहे. माझ्या कारखान्यापासून पाच किमीवर आंतरवाली सराटीचे आंदोलन होत असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने आपण पोह्याचे स्टॉल लावले होते. जालन्यात धनगर समाजाचा मोर्चा झाला तेव्हाही स्टॉल ठेवला होता. मोर्चे होतात त्यावेळी माणूसकी विसरायचे नसते, त्यामुळे ज्यावेळी लाठीचार्ज झाला तेव्हा वैद्यकीय मदत करण्यासाठी आपण तेथे गेल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. हा लढा उदात्त हेतूसाठी आहे, त्याला डायव्हर्ट करु नये असेही ते म्हणाले. शरद पवार, रोहीत पवार आणि आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून एक टक्का जरी यात दोषी आढळलो तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 27, 2024 08:16 PM
Video | ‘आमच्या नेत्याबद्दल अर्वाच्चभाषा, तुम्ही काय एवढे मोठे…,’ काय म्हणाले गिरीश महाजन
Video | जरांगेंना आपण एक फोन जरी केल्याचे जर सिद्ध झाले…,’ काय म्हणाले शरद पवार