Video: संसद भवनात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक, केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोगाबाबत होणार चर्चा

Video: संसद भवनात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक, केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोगाबाबत होणार चर्चा

| Updated on: Aug 02, 2022 | 11:34 AM

खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर केंद्रीय तपस यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्याने होत आहे. या मुद्यावर आक्रमक भूमिका मांडण्यासाठी आज संसद भवन परिसरात विरोधी पक्षाच्या नेत्यांची ही बैठक होत आहे.

आज सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात विरिधि पक्ष नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोगाबाबत चर्चा होणार आहे. प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturwedi) या शिवसेनेच्या वतीने सहभागी होतील, तर स्थगन प्रस्तावाबाबत अनिल देसाई राज्यसभा अध्यक्षांना नोटीस देतील. सध्या संसद भवनात संसदेचे अधिवेशन पाहायला मिळत आहे. राज्यसभेतसुद्धा शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काल नोटीस दिली होती. आजही शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभा अध्यक्षांना नोटीस दिलेली आहे. खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर केंद्रीय तपस यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्याने होत आहे. या मुद्यावर आक्रमक भूमिका मांडण्यासाठी आज संसद भवन परिसरात विरोधी पक्षाच्या नेत्यांची ही बैठक होत आहे.

Published on: Aug 02, 2022 11:34 AM
J. P. Nadda Video : देशातून सर्व पक्ष नष्ट होतील, फक्त भाजपच उरणार : जे.पी. नड्डा
Sanjay Raut: संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या प्रवक्तेपदासाठी नव्या नावांची चर्चा