Video: मिशन विदर्भाच्या तयारीसाठी मनसे पदाधिकारी आज नागपूर दौऱ्यावर, काय असेल अजेंडा?
मिशन विदर्भाच्या तयारीसाठी मनसे पदाधिकारी आज नागपूर दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि राजू उंबरकर आज नागपुरात जाणार आहेत.
मिशन विदर्भाच्या तयारीसाठी मनसे पदाधिकारी आज नागपूर दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि राजू उंबरकर आज नागपुरात जाणार आहेत. 18 ते 23 सप्टेंबर दरम्यान राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यात संघटनेमध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये राज ठाकरे यांचा दौरा असेल. हा मुंबई ते नागपूर प्रवास ते रेल्वेने करणार असल्याची चर्चा आहे. विदर्भात मनसेची ताकद वाढविण्यासाठी हा दौरा असेल. याशिवाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
Published on: Sep 14, 2022 09:00 AM