Video: टेक्सटाईल पार्क अमरावतीतच होणार- खासदार अनिल बोंडे
टेक्सटाईल पार्कवर खासदार अनिल बंडे यांची प्रतिक्रिया
Image Credit source: TV9 Marathi

Video: टेक्सटाईल पार्क अमरावतीतच होणार- खासदार अनिल बोंडे

| Updated on: Jul 27, 2022 | 12:34 PM

विदर्भ आणि मराठवाडा हे दोनीही भाग मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतात मात्र शेतकरी कायमच हवालदिल असतो. या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नही बिकट आहे.

विदर्भाच्या अर्थकारणाला पंख लावू शकणारा बहुचर्चित टेक्सटाईल पार्क अमरावतीतच (Textile park amravati) होणार असल्याचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी स्पष्ट केले. अमरावतीत उभारले जाणारे टेक्स्टाईल पार्क हे औरंगाबाद येथे हलविण्याच्या चर्चांना उधाण आले होते, यावर अमरावती आणि औरंगाबाद या दोनीही शहरात हे टेक्स्टाईल पार्क उभारले जाणार असल्याचे खासदार बोंडे यांनी सांगितले. विदर्भ आणि मराठवाडा हे दोनीही भाग मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतात मात्र शेतकरी कायमच हवालदिल असतो. या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नही बिकट आहे. त्यामुळे हे टेक्सस्टाईल पार्क विदर्भ आणि मराठवाड्यातच होणार असल्याचे बोंडे म्हणाले. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. त्यांच्या चांगल्या आरोग्याबद्दल मनोकानमाही व्यक्त केली.

Published on: Jul 27, 2022 12:34 PM
Shambhuraj Desai : एकनाथ शिंदेंवरील टीका दुर्दैवी, शंभूराज देसाईंची नाराजी, ठाकरेंवर टीकास्त्र
Samna Interview: सामानाची मुलाखत म्हणजे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न- योगेश खैरे