Video: उदयनराजे चवताळल्यासारखे वागतात- आमदार शिवेंद्रराजे भोसले
उदयनराजेंच्या विरोधात मी 10 हजार मताधिक्याने निवडून आलो आहे, त्यामुळे मला आल्हाद आमदारकी मिळाली हे त्यांचे विधान बालिशपणाचे असल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले.
उदयनराजे भोसले यांनी काल आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर शिवेंद्रराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंना मुंबई दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नसल्याने ते चिडले असल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले. उदयनराजे कायमच बोचरी टीका करीत असतात मात्र कालच्या त्यांच्या आरोपांमधून राग दिसून येत होता, ते चवताळल्यासारखे वागतात असेही शिवेंद्रराजे म्हणाले. उदयनराजेंच्या विरोधात मी 10 हजार मताधिक्याने निवडून आलो आहे, त्यामुळे मला आल्हाद आमदारकी मिळाली हे त्यांचे विधान बालिशपणाचे असल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले. सध्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.
Published on: Sep 09, 2022 09:26 AM