Video | मुख्यमंत्री बनण्याबाबत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काय दिला सल्ला

| Updated on: Feb 11, 2024 | 4:06 PM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष हिसकावल्यानंतर आणि भाजपासोबत महायुतीत सत्तेत सहभागी झाल्यानंतर आपल्याच पक्षातील उत्साही कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. सारखं सारखं मुख्यमंत्री..मुख्यमंत्री अशा धोशा लावू नका असेच अजित पवार यांनी म्हटले आहे.

Follow us on

पुणे | 11 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 2004 ला सर्वाधिक मोठा पक्ष झाला. राष्ट्रवादीला 71 जागा तर काँग्रेसला 69 जागा आल्या होत्या. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष असताना मुख्यमंत्रीपद का घेतले नाही ? याच्या खोलात मी आता जात नाही. त्यावेळी भुजबळ साहेब होते. आर.आर. पाटील होते. त्यावेळी माझी अपेक्षा पण नव्हती. पण त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता असे राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील मेळाव्यात भाषण करताना सांगितले. ते पुढे म्हणाले की आणि मी आताही बघितलं बाबांनो जरा दमाने घ्या. जरा कळ सोसा, इतक्या लगीच सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री असं करु नका… पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु, असा सल्ला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. अशा प्रकारे अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घाई न करण्याचा आणि वाट पाहाण्याचा सल्ला दिला.