विजयानंतर मॅजिक फिगरबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निकालानंतर काही निकालांवर संशय व्यक्त केला आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्या आपण दिल्लीत जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेत जादा जागा मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी दावा करायला पाहीजेत अशी मागणी केली. उद्या दुपारनंतर आपण दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार असल्याचेही ते म्हणाले. एनडीएचे बहुमत स्पष्ट झालेले नाही. त्यांच्याकडे अजून मॅजिक फिगर नाही. बिहारमध्ये उशीरा मजमोजणी सुरु झाली आहे. काही निकाल अजूनही लागलेले नाहीत. उद्याच्या बैठकीत इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा नेता सर्वानुमते ठरविला जाणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. सत्तास्थापनेसाठी मॅजिक फिगर गाठण्यासाठी तुम्ही अपक्ष आणि इतर पक्षांनासोबत घेणार का? असा सवाल ठाकरे यांना करण्यात आला. ज्यांना भाजपने छळलं ते सर्व आमच्यासोबत येतील. सर्व देशभक्त आमच्या सोबत येतील. चंद्राबाबू यांनाही भाजपने फार त्रास दिला होता. ज्यांना त्रास दिला ते सर्व आमच्यासोबत येतील, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. काही निकाल संशयास्पद असल्याचे ठाकरे म्हणाले कोकणातील जनता शिवसेनेशी अशी वागणारच नाही असेही ते म्हणाले. तसेच अमोल कीर्तिकर यांच्या निकालाला आम्ही आव्हान देऊच असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.