Video: अजित पवारांना गढूळ पाणी प्यायला का नाही दिले? संतप्त महिलेचा सवाल

Video: अजित पवारांना गढूळ पाणी प्यायला का नाही दिले? संतप्त महिलेचा सवाल

| Updated on: Jul 29, 2022 | 2:17 PM

अजित पवारांच्या दौऱ्या निमित्त्य त्यांचे कार्यकर्ते पाण्याच्या बॉटल घेऊन आले होते. त्यावेळी एका संतप्त महिलेने आपला रोष व्यक्त केला. अजित दादांना गढूळ पाणी प्यायला का दिले नाही असे त्या म्हणाल्या.

विरोधी पक्ष नेते अजित पवार सध्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी अजित पवार करीत आहेत. पुरामुळे कोन्होली गावाचे मोठे नुकसान झाले आहे. येथे पिण्याचे पाणीसुद्धा गढूळ येते. अजित पवारांच्या दौऱ्या निमित्त्य त्यांचे कार्यकर्ते पाण्याच्या बॉटल घेऊन आले होते. त्यावेळी एका संतप्त महिलेने आपला रोष व्यक्त केला. अजित दादांना गढूळ पाणी प्यायला का दिले नाही असे त्या म्हणाल्या. गावात पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आले आहे. मात्र ते नादुरुस्त असल्याने गावकऱ्यांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. कान्होली गावात मोठ्याप्रमाणात पूर आला होता. नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याने मदतीची मागणी ते सरकारकडे करीत आहेत. याशिवाय इतरही सोयी सुविधेच्या समस्या या परिसरात आहेत.

Published on: Jul 29, 2022 02:17 PM
Video: साताऱ्यात 5 वर्षात कुठलही विकासकामं नाही- शिवेंद्रराजे
Jalgav: दहिवदमध्ये एसटी चालकाला ओव्हरटेक केलं म्हणून मारहाण