विधानभवनच्या पायऱ्यांवरच्या चित्रीकरणास बंदी: सरकारकडून सूचना जारी: निलम गोऱ्हेंची माहिती

| Updated on: Aug 26, 2022 | 8:49 AM

 बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असले तरी आता यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यामुळे हा निर्णय विरोधकांसाठी धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुंबईः राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यांनतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर 2 दिवसांपूर्वी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये प्रंचड राडा (Political Clashes) झाला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने आरोप- प्रत्यारोपांच्या एकमेकांवर फैरीही झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर विधान भवनाच्या बाहेर आमदारांचा जोरदार राडा झाल्यानंतर आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर होत असलेल्या आंदोलनाच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आलेली आहे. बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या असून याबाबतची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली आहे. बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असले तरी आता यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यामुळे हा निर्णय विरोधकांसाठी धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Published on: Aug 26, 2022 08:49 AM