अध्यक्ष नार्वेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, ‘तो अधिकार राजकीय पक्षाचा, पण…’

| Updated on: Jul 11, 2023 | 9:41 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अशाच पद्धतीने फूट पडली आहे. अजित पवार यांनी देखील बंडखोरी करत तेही सत्तेत सामील झाले आहेत. त्यावरून नका राजकीय पेच निर्माण झाला आहे.

मुंबई : गेल्या एका वर्षापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठं दोन भूंकप झाले आहेत. एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झाला. ज्यातून शिंदे गट बाहेर पडला आणि भाजपबरोबर सत्तेत आला. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अशाच पद्धतीने फूट पडली आहे. अजित पवार यांनी देखील बंडखोरी करत तेही सत्तेत सामील झाले आहेत. त्यावरून नका राजकीय पेच निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप बजावला आहे. तर अजित पवार गटाकडून आव्हाड यांची नियुक्तीच रद्द करण्यात आली आहे. त्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी नार्वेकर यांनी व्हिपची नेमणूक करण्याचा अधिकार राजकीय पक्षाला असल्याचं सांगताना ते सुप्रीम कोर्टाने निकाला स्पष्टपणे सांगितल्याचं सांगितलं. पण सध्या हाच मुद्दा पेच निर्माण करत आहे. त्यावर नेमका मुळ पक्ष कुणाचा? आणि कोण रिप्रेझेंट करतं? हे पाहवं लागेल असं म्हटलं आहे.

Published on: Jul 11, 2023 09:41 AM
असं, कसं? शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे लोक काँग्रेसच्या वाटेवर? बघा एकनाथ खडसे यांनी नेमका काय दावा केला…
महारष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसचा ‘हा’ नेता बनणार आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता?