ISRO Aditya L1 mission | आदित्य एल – १ अंतराळात असं झेपावलं, पोहचायला किती दिवस लागणार?

| Updated on: Sep 02, 2023 | 2:06 PM

श्रीहरीकोटामधून आदित्य एल १ चं लाँचिंग झालंय. पृथ्वीपासून सूर्य हा १५ लाख किमी दूर आहे. सूर्याचं हे अंतर चंद्रापेक्षा चार पटीने दूर आहे. त्यामुळे आदित्य एल १ पा पोहचायला चार महिन्यांचा कालावधी लागेल, असा इस्त्रोचा अंदाज आहे.

हैदराबाद : आदित्य एल १ अंतराळात झेपावलं. भारताची ही पहिली सौर मोहीम आहे. अमेरिका, जर्मनी, युरोपनं सौर मोहिमा राबवल्या आहेत. आदित्य एल १ हे प्रक्षेपित करण्यात आलंय. श्रीहरीकोटामधून आदित्य एल १ चं लाँचिंग झालंय. पृथ्वीपासून सूर्य हा १५ लाख किमी दूर आहे. सूर्याचं हे अंतर चंद्रापेक्षा चार पटीने दूर आहे. त्यामुळे आदित्य एल १ पा पोहचायला चार महिन्यांचा कालावधी लागेल, असा इस्त्रोचा अंदाज आहे. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर चार टप्प्यांमध्ये मोजलं जातं. पहिल्या टप्प्यापर्यंत आदित्य एल १ हे पोहचणार आहे. पृथ्वी आणि सूर्या यांच्यामध्ये हा आदित्य एल १ पोहचेल. भारताची ही पहिलीचं सौर मोहीम आहे. यातून सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळ अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणे इस्त्रोला शक्य होणार आहे. आदित्य एल १ लाँच केल्यानंतर १२५ दिवस तिथंपर्यंत पोचायला लागणार आहेत. सूर्याच्या विविध स्तरांबाबत माहिती मिळू शकणार आहे. सूर्याच्या घडामोडींचा पृथ्वीतलावावर कसा परिणाम होतो. याची माहितीसुद्धा मिळू शकणार आहे.

Published on: Sep 02, 2023 01:47 PM
Aditya L1 Launching | भारताच्या पहिल्या सूर्य मोहीमेच्या लॉन्चिंगचा LIVE VIDEO पाहा
Sambhaji Raje Meet Jalna protestors | संभाजीराजे जखमी आंदोलकांच्या भेटीसाठी, आंदोलकांनी सांगितला तो प्रसंग