VIDEO | 13 गुंठे जमीन, 13 हजार खर्च, झाला फायदाच फायदा… कुठे शेतकरी झाला झेंडूच्या शेतीने लखपती
श्रावण आला म्हटलं की लोकांची लगबग वाढते. लोक धार्मिक विधीला अधिक महत्व देतात. तर हाच मुद्दा लक्षात घेऊन एका शेतकऱ्याने मात्र चांगलाच नफा कमावला आहे. फुलांच्या शेतीतून लखपती झाला आहे.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका फुल शेतीसाठी म्हणून ओळखल्या जातो. या तालुक्यात सर्वच प्रकारच्या फुलांची शेती केली जाते. सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झालीय. या महिन्यात इतर फुलांसोबतच झेंडूच्या फुलांना मोठी मागणी वाढलीय. मुदखेड तालुक्यातील वाडी (मुक्ताई) या गावातील विजय इंगोले या शेतकऱ्याने आपल्या शेतातील 13 गुंठे जमिनीत झेंडूची लागवड केलीय. सध्या त्यांची ही बाग झेंडूच्या फुलांनी बहरलीय. या झेंडूच्या लागवडीसाठी इंगोले यांना केवळ 13 हजार रुपये खर्च आला. तर नांदेडच्या फुल मार्केटमध्ये या झेंडूची विक्री सुरू आहे. सध्या या फुलांना चांगला भाव मिळतोय. 13 गुंठे जमीन, 13 हजार रुपये खर्च केला आहे. मात्र खर्च वजा करता दोन महिन्यात विजय इंगोले यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
Published on: Aug 19, 2023 09:26 AM