“अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून 7% लोकांचीच पसंती”, शिवसेनेचा टोला

| Updated on: Jun 15, 2023 | 3:15 PM

शिवसेनेच्या जाहिरातीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. "74% लोकांना शिंदे मुख्यमंत्री नकोत, असाही सर्व्हेचा अर्थ निघतो", असं अजित पवार म्हणाले. यावर शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना पलटवार केला आहे.

पुणे : शिवसेनेच्या जाहिरातीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “74% लोकांना शिंदे मुख्यमंत्री नकोत, असाही सर्व्हेचा अर्थ निघतो”, असं अजित पवार म्हणाले. यावर शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना पलटवार केला आहे. “अजित पवार काहीही बोलत असतील. अजित पवारांनी स्वत:चा सर्व्हे पाहिला का ? त्यांना फक्त 7 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दाखवली आहे. अजित पवार महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे. आज त्यांची अवस्था काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले.

Published on: Jun 15, 2023 03:15 PM
“संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात यावी”, धमकी प्रकरणावरून नितेश राणेंची सरकारकडे मागणी
शरद पवारांवर बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली, म्हणाला ‘लायकीत रहावं’