शिवसेना नेत्याची देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाला, “वसंतदादा पाटील यांच्यानंतर…”
शिवसेना ठाकरे यांनी कालच्या बैठकीत औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी समाचार घेतला आहे.
पुणे, 07 ऑगस्ट, 2023 | शिवसेना ठाकरे यांनी कालच्या बैठकीत औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. “शिवसेना फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. ही औरंग्याची वृत्ती भाजपमध्ये आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणालेय उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी समाचार घेतला आहे. विजय शिवतारे यांनी फडणवीस यांची प्रशंसा करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “वसंतदादा पाटील यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस सर्वोत्तम नेते आहेत. उद्धव ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचे आहे. उद्धव ठाकरे सध्या भांबवलेले आहेत.”
Published on: Aug 07, 2023 11:20 AM