बारामती लोकसभा मतदारसंघाचं नाव बदला अन् ‘हे’ ठेवा; विजय शिवतारे यांची मागणी

| Updated on: Feb 08, 2023 | 1:39 PM

बारामती लोकसभा मतदारसंघाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदेगटाचे नेते विजय शिवतारे यांनी ही मागणी केली आहे. पाहा...

बारामती लोकसभा मतदारसंघाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे नाव बदलून पुणे दक्षिण मतदारसंघ करा, अशी मागणी शिंदेगटाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तुमची तयारी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपलं मत मांडलं. बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा विजय शिवतारेंनी व्यक्त केली आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील, असंही शिवतारेंनी सांगितलं आहे.

Published on: Feb 08, 2023 01:39 PM
शिवसेना एकच! गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणं हे विकृतीचं लक्षण- उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे यांना आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरे यांनाच रवी राणा यांचं आव्हान; म्हणाले, ‘मी राजीनामा देतो…’