हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी तर उद्धव ठाकरेंनी केली; विजय शिवतारेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण

| Updated on: Sep 30, 2022 | 8:43 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती.  या टीकेला आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती.  या टीकेला आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी (NCP),  काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनीच हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी केली असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याचंही यावेळी विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. यावेळी शिवतारे यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्याची देखील आठवण करून दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा म्हटलं होतं की,  कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी  राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करणार नाही. वेळ पडली तर माझं दुकानं बंद करले. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

Published on: Sep 30, 2022 08:42 AM
महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर; अब्दुल सत्तार यांनी कोणत्या नेत्यावर केलेय ही घणाघाती टीका
4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 30 September 2022 -TV9