“संभाजी भिडे राष्ट्रद्रोही माणूस, जिथे दिसतील तिथून उचलून कोठडीत घाला”, काँग्रेस नेत्याची राज्य सरकारकडे मागणी

| Updated on: Aug 02, 2023 | 11:23 AM

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरु आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “संभाजी भिडे हा राष्ट्रद्रोही माणूस आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान त्यांनी केलेला आहे.जोतिबा फुले यांच्यासंदर्भात या नालायक माणसाने गलिच्छ शब्दात वक्तव्य केलेलं आहे.असेल तिथे त्याला उचलून कोठडीत घालावं. जिथे स्वतः मोदीजी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालेत त्या साईबाबांचा अपमान या पापगुरू माणसाने केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी असा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. आता भिडेंना तुरुंगात कधी टाकणार असा माझा प्रश्न आहे.”

 

Published on: Aug 02, 2023 11:22 AM
अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार? आ. आशिष जैसवाल म्हणतात, ‘जनतेची इच्छा आहे…’
प्रियंका गांधी थेट राजकारणात उतरणार? अमेठी किंवा रायबरेलीतू मैदानात उतरण्याची शक्यता