‘भाजप कार्यकर्त्यांना शिंदे गटातील आमदार टॉर्चर का करतात?’, काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल

| Updated on: Aug 15, 2023 | 8:22 AM

यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरूनच आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारावर कारवाई करणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

मुंबई, 15 ऑगस्ट 2023 | शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर हा आरोप भाजपच्या एका कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरूनच आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारावर कारवाई करणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत. तर याचमुद्द्यावरून काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. तर भाजपला देखील सवाल केला आहे. दहिसर येथील जीवघेण्या खदानी भरणीचे काम करणाऱ्या व्यावसायिक साहेबराव बारकू पवार यांच्याकडे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी शाखाप्रमुखाच्या हस्ते खंडणी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दहिसर पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

Published on: Aug 15, 2023 08:22 AM
विजय वटेट्टीवार यांच्या ‘त्या’ टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला; म्हणाले, ‘ते’ कारण काढणं दुर्दैवी
राज ठाकरे यांना भाजपची ऑफर शिंदे गटाचा नेता म्हणतो, ‘कोणासोबत जावं, नाही जावं…’