‘एकीकडे मणिपूर जळतोय, दुसरीकडे सत्कार स्वीकारले जातोय’; काँग्रेस नेते वड्डेटीवार यांची मोदी यांच्यावर टीका

| Updated on: Aug 01, 2023 | 11:55 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांचा सन्मान होणार असून त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर शरद पवार यांच्या या पुरस्कार सोहळ्याला जाण्यावरून आता विरोधकांकडून टीका होत आहे.

Follow us on

नागपूर, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी येथील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांचा सन्मान होणार असून त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर शरद पवार यांच्या या पुरस्कार सोहळ्याला जाण्यावरून आता विरोधकांकडून टीका होत आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. तर दैनिक सामनामधून देखील टीका करण्यात आली आहे. यावरूनच काँग्रेसचे नेते आणि नुकताच विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्त झालेले विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका करताना यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी, राष्ट्रवादी वेगळे गट होण्यापूर्वी शरद पवार यांनी आजच्या पुण्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं होतं. पण हा पुरस्कार मोदींना का दिला जातोय आणि ते हा पुरस्कार का स्वीकारतायत हे कोडं आहे असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे. तर यावेळी हा पुरस्कार काँग्रेस पुरस्कृत असल्याची टीका होत असल्याने त्यांनी थेट रोहीत रानडे यांच्यावर कारवाई होईल असे संकेत दिले आहेत. तर पवार यांना आवाहन करताना, नेता हा जनतेमुळे होतो. जनता नेत्याला बनवतो. त्यामुळे प्रत्येक नेत्यांनी जनतेच्या भावनेचा आदर करावा. जनसामांन्यांची भावना आहे की आज पवार साहेब यांनी पंतप्रधान मोदींसोबत मंचावर बसू नये त्यामुळे त्यांनी जाऊ नये असे म्हटलं आहे. तर या कार्यक्रमाचा महाविकास आघाडीवर परिणाम नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.