‘सरकारला भिती होती म्हणून निवडणुका थांबवल्या?’, वडेट्टीवार यांचा भाजपवर आरोप

| Updated on: Aug 20, 2023 | 11:04 AM

गेल्या दोन एक वर्षापासून राज्यात कोणत्याच निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्वराज्य संस्था सध्या कोलमडल्या आहेत. तर त्यांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे.

मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राज्यातील महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका या झालेल्या नाहित. त्यामुळे येथे सध्या प्रशासक आहे. त्यामुळे तेथे नागरिकांच्या कामांना खो बसत आहे. तर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असल्याने या निवडणुका रखडल्या आहेत. तर येत्या काही दिवसात त्यावर निकाल लागून निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निकाल लागला तर स्वागतच आहे. गेली दिड दोन वर्ष झाली जिल्हा परिषदेला निवडणूका झालेल्या नाहीत. या फक्त सरकारला भिती होती म्हणून थांबवल्या. आता भीती कमी झाली असेल तर घेऊ द्या. आम्ही, महाविकास आघाडीसाठी तयार आहोत. देशातील राज्यातील जनता सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या पाठीमागे उभी राहील असा विश्वास आहे.

Published on: Aug 20, 2023 11:04 AM
‘सामनातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायला वाचा फोडण्यात आलीय’; वडेट्टीवार यांचा भाजपवर घणाघात
‘नाहीतर गेलेले बळ गेलेला भुजबळ असं होईल’; ‘त्या’ विधानावरून भुजबळ यांना काँग्रेस नेत्याचं समर्थन