प्रदेशाध्यक्ष बदलावरून विजय वडेट्टीवार यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले…
नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरून राज्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे लवकरच पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा अधिकार काढून घेतला जाईल अशी चर्चा सुरू होती.
मुंबई, 2 ऑगस्ट 2023 | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरून राज्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे लवकरच पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा अधिकार काढून घेतला जाईल अशी चर्चा सुरू होती. तर मध्यंतरी यावरूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्ली दौरा केला होता. तर त्यांच्यासह काही पक्षातील नाराज नेते हे देखील दिल्लीला गेले होते, अशी ही चर्चा आहे. यावरून आता वडेट्टीवार यांनी ज्या काही चर्चा आहेत त्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटलं आहे. तसेच सर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Aug 02, 2023 01:19 PM