महारष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसचा ‘हा’ नेता बनणार आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता?

| Updated on: Jul 11, 2023 | 9:47 AM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण बनणार? याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहेत. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदावरून दावा करण्यात आला आहे. सभागृहात आता काँग्रेस आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण बनणार? याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहेत. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदावरून दावा करण्यात आला आहे. सभागृहात आता काँग्रेस आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसलाच विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते बनण्याची शक्यता आहे. पण याबाबत सध्या तरी अधिकृत अशी कोणतीही घोषणा झालेली नाही.

 

Published on: Jul 11, 2023 09:47 AM
अध्यक्ष नार्वेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, ‘तो अधिकार राजकीय पक्षाचा, पण…’
‘पवार यांनी आणखी एक पुस्तक लिहावं, लोक माझे का पांगती?’; सदाभाऊ खोत यांची पुन्हा टीका