Vinayak Mete Mother | विनायक मेटेंचा अपघात नसून घातपात असल्याचा विनायक मेटेंच्या आई संशय
आज पहाटे पाचच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. मात्र मेटे यांचे निधन अपघाती नसून हा घातपात आहे, असा आरोप त्यांच्या आईने केला आहे.
बीड : माझं लेकरु अपघाताने गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे. माझं लेकरु मराय सारखा नव्हता. जाणून बुजून माझं लेकरु मारलं, असा आरोप विनायक मेटे यांच्या मातोश्रींनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. मात्र मेटे यांचे निधन अपघाती नसून हा घातपात आहे, असा संशय त्यांच्या आईने व्यक्त केला आहे.