Vinayak Raut: तानाजी सावंतांची लायकी काय? विनायक राऊतांचा हल्लाबोल
शिंदे गटातील आमदार गद्दारांची कीड आहे, भाजप त्यांना पोसते आहे असा घणाघात सावंत यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या यात्रेत सहभागी होत असल्याचे राऊत म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी ‘कोण आदित्य ठाकरे तो फक्त एक आमदार आहे’ असे विधान केल्यानंतर शिवसेनेचे आमदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण तानाजी सावंत त्यांची लायकी काय असे म्हणत विनायक राऊत यांनी तानाजी सववांत यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे गटातील आमदार गद्दारांची कीड आहे, भाजप त्यांना पोसते आहे असा घणाघात सावंत यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या यात्रेत सहभागी होत असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाष्यावरही टीका केली. भाजपला शिवसेना संपवायची आहे मात्र शिवसेनेला संपविणारा अजून जन्माला आलेला नाही असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.
Published on: Aug 02, 2022 12:30 PM