“ईडीने यशवंत जाधव अन् इकबाल चहल यांचीही चौकशी करावी”, कोरोना काळातील घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाची मागणी
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये ईडीनं धाड टाकली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये ईडीनं धाड टाकली आहे. तसेच सनदी अधिकारी संजीव जैसवाल यांच्या घरी देखील ईडीचा छापा पडला आहे. ईडीच्या या धाडींवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”अशा कारवाया करून कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होणार नाही.फक्त राजकीय द्वेषापोटी सूरज चव्हाण, संजीव जैस्वाल सुजित पाटकर यांच्यावर कारवाई केली जात आहे. राजकीय द्वेषापोटी गाढलेला मडं उकरण्याचा हा प्रकार आहे.राजकीय सूडबुद्धीने विरोधकांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे. त्यावेळचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि आयुक्त इकबाल चहल यांची सुद्धा चोकशी व्हावी. तुमाच्यकडे आल्यानं त्यांना आश्रय देणं आणि विरोधकांना त्रास द्याल असं चालणार नाही. राजकीय सुडापोटी विरोधकांना त्रास द्यायचा हे संपूर्ण देशात चालू आहे,” असं विनायक राऊत म्हणाले.