शिवसेनेच्या जाहिरातीवर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, फडणवीसांचं घर उद्ध्वस्थ…”
आजच्या अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेनं जाहिरात दिली आहे. 'राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे' अशी ही जाहिरात आहे. दरम्यान शिवसेनेच्या जाहिरातीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे.
मुंबई : आजच्या अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेनं जाहिरात दिली आहे. ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ अशी ही जाहिरात आहे. दरम्यान शिवसेनेच्या जाहिरातीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलंय की, तुमचं घर मी कसं उद्ध्वस्थ करु शकतो. शिवसेना एकनाथ शिंदे यांनी उद्ध्वस्थ केलीय, आता भाजप देखील मोडकळीस आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सर्व्हेला कोणताही अधिकृतपणा नाही, फक्त आपला ढोल वाजवायचा. भाजपच्या आधारे मुख्यमंत्री पद मिळालं, त्यांनाच खाली ढकलायचं. पंतप्रधांनाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात वर्चस्व प्राप्त करायचं, हा त्यांचा जाहीरातीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंचा दुटप्पीपणा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच रेकाँर्ड कुणी मोडू शकत नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.