‘ठाकरे ब्रँड पुसता येणार नाही अन् खोक्यांनी विकतही घेता येणार नाही’
निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबईः गद्दार पार्टीने कितीही नीच प्रयत्न केले. आम्ही दिलेली नावं घेण्याचा प्रयत्न केला तरी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे हा ब्रँड पुसला जाणार नाही आणि खोक्यांनी तो विकतही घेता येणार नाही, असं खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी ठणकावून सांगितलंय. निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पक्षावर दावा ठोकणारे कागदपत्र सादर केल्यानंतर काही तासातच निवडणूक आयोगाने अंतरिम निर्णय घेणं हे एकतर्फी वर्तन असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. आम्हाला आमंचं म्हणणं मांडण्याची संधी द्यायला पाहिजे होती, असं त्यांचं म्हणणं आहे.
ज्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना पक्षावर घाईने निर्णय देण्यात आला, त्याच निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेसने आज जाहीर पाठींबा दर्शवला. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विनायक राऊत देखील उपस्थित होते.