“समझनेवाले को इशारा काफी है!” पालिका अधिकाऱ्यावर मारहाण प्रकरणी विनायक राऊत यांचं समर्थन
वांद्रे पूर्वच्या शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करताना बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या घटनेमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा पाडण्याचा आदेश देणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला चोप दिला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीचं विनायक राऊत यांच्याकडून समर्थन करण्यात आलं आहे.
रत्नागिरी: वांद्रे पूर्वच्या शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करताना बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या घटनेमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा पाडण्याचा आदेश देणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला चोप दिला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीचं विनायक राऊत यांच्याकडून समर्थन करण्यात आलं आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीचं मी समर्थन करतो. मिंधे गटाच्या एका घमंडी पदाधिकाऱ्याने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यावर जबरदस्तीने दबाव टाकला. महापालिकेकडून ज्या पद्धतीने बाळासाहेब यांच्या फोटोवर हातोडा पडल्यावर शिवसैनिक आक्रमक होणारच. समजनेवाले को इशारा काफी है!
Published on: Jun 28, 2023 11:04 AM