“मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, पण एकनाथ शिंदे यांच्या विसर्जनाची तयारी सुरु”, ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं विधान
अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांना आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना महत्वाची खाती देण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चाही सुरु आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
पुणे, 24 जुलै 2023 | अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांना आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना महत्वाची खाती देण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चाही सुरु आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आपण मागच्या अनेक महिन्यांपासून बोलत आहोत. त्यांची कितीही पोपटपंची सुरू असली तरी मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. भाजपा त्यांना मंत्रीमंडळ विस्तार करू देणार नाही. याउलट भाजपाकडून एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या गटाच्या विसर्जनाची सुरुवात झाली आहे.”
Published on: Jul 24, 2023 09:00 AM