विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री प्रताप सरनाईक ?

| Updated on: Dec 25, 2024 | 3:51 PM

माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळी याचा प्रकृती बरी नसल्याने त्याला मदत करण्याचे मध्यंतरी अनेकांना जाहीर केले होते. विनोद कांबळी याला दोनवेळा ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्याला नीट बोलता आणि चालता येत नाही. त्याला आता ठाणे येथील आकृती रुग्णालयात दाखल केले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा सचिन तेंडुलकर सोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्याची प्रकृती बरीच खालावलेली दिसत होती. त्यावरुन विनोद कांबळी याला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले होते. आता माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मदतीचा हात दिला आहे. विनोद कांबळी याला दोन वेळा ब्रेन स्ट्रोक येऊन गेलेला आहे. त्यामुळे त्याला नीट बोलता येत नाहीत, तसेच आधाराशिवाय नीट चालता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये आयुष्यभर मोफत उपचार केले जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.  विनोद कांबळी याच्या पत्नीच्या नावाने खाते उघडण्यात आले आहे, त्यात ज्यांना मदत करायची असेल ते करू शकतात असेही यावेळी सांगण्यात आले आहे. वानरसेना नावाच्या संस्थेने विनोद कांबळी याच्या खर्चाची जबाबदारी उचलली आहे.

Published on: Dec 25, 2024 03:46 PM
Beed हत्येचा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, या खासदाराने केली मागणी
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा