Video | छत्रपती संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?

| Updated on: Mar 02, 2024 | 4:29 PM

मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी संभाजीनगरातून लोकसभेच्या निवडणूकीची उमेदवारी जाहीर केली आहे. संभाजीनगरात शहर भागात अजून नळाला पाणी येत नाही. ग्रामीण भागात वीज नाही. आपल्याकडे अठरापगड जातीचा पाठींबा आहे. त्यामुळे आपण निवडणूकीच्या रिंगणात इच्छुक असलेल्यांमध्ये सर्वात तरुण उमेदवार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर | 2 मार्च 2024 : मराठा आरक्षण लढ्यातील सक्रीय याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरातून लोकसभेसाठी आपली उमेदवारी स्वत:च घोषीत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलणी झाली काय ? असा प्रश्न विचारला असता यावर विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजयंतीला आले तेव्हा त्यांनी मला विचारले होते परंतू तेव्हा मी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर पाहू असे म्हटले होते. संभाजीनगरात धनुष्यबाणालाच मत देण्याची परंपरा असून येथील जागा शिंदे गटालाच मिळेल असे वाटते. परंतू अद्याप पर्यंत कुठल्याच पक्षाचा प्रस्ताव आपल्याला आला नाही. आला तर ठीक नाहीत तर अपक्ष निवडणूक लढवू असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आपले मित्र आहेत. सरकारने जर 10 टक्के मराठा आरक्षण जाहीर केले आहे तर त्याचा लाभ घ्यायला हवा, आता पोलीस भरतीच्या जागांचा मराठी तरुणांनी लाभ घ्यायला हवा असेही ते म्हणाले.

Published on: Mar 02, 2024 04:27 PM
video | ‘धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड, तर गुन्हे दाखल करु…,’ लोढा यांनी स्पष्टच सांगितले
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका