गृहमंत्री Dilip Walse Patil आणि Vishwas Nangare Patil यांच्यामध्ये बैठक झाली
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह पोलीस आयुक्तांबरोबर बैठका घेतल्या आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह पोलीस आयुक्तांबरोबर बैठका घेतल्या आहेत. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर झोन-2चे डीसीपी योगेश कुमार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आजही दिलीप वळसे पाटील यांनी सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre-Patil) यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. तसेच नांगरे पाटील यांना काही सूचनाही दिल्या आहेत. यावेळी राज्याचे महाधिवक्ता आणि सरकारी वकीलही उपस्थित होते. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते प्रकरणावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही.
मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे आज सकाळीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर आले. यावेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष सरकारी वकील प्रदीप घरतही दाखल झाले होते. त्याशिवाय पोलीस आयुक्त संजय पांडे, नवीन डीसीपी निलोत्पल, दिलीप सावंत बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.