500 किलो फळांच्या आरासाने सजले विठ्ठल रखुमाईचे मंदिर, पाहा हा व्हिडिओ
फळांची आरास करायला तब्बल दहा तास इतका वेळ लागला. विठुरायाच्या दर्शनाला आणि ही फळांची आरास बघायला दूरवरून भाविक गर्दी करताहेत. ही फळे सायंकाळी प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली.
नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठुरायाचा गजर होतोय. नागपुरातील निर्मल नगरी येथील मंदिरात 500 किलोंच्या फळांची आरास करण्यात आलीय. सफरचंद, आंबे, केळी, मोसंबी, संत्री, अननस, द्राक्षे यांची आकर्षक अशी सजावट विठ्ठल रखुमाईला करण्यात आलीय. वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची आरास विठुरायाच्या मंदिरात अगदी खुलून दिसत आहे. या फळांची आरास करायला तब्बल दहा तास इतका वेळ लागला. विठुरायाच्या दर्शनाला आणि ही फळांची आरास बघायला दूरवरून भाविक गर्दी करताहेत. ही फळे सायंकाळी प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली. या मंदिरात महिला कीर्तनात रंगल्या होत्या. ताल मृदूंगच्या तालावर नाचत हरिपाठ करत होत्या. विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या घरी प्रसादरूपी फळ जावे अशी इच्छा होती. त्यामुळे अशी आरास करण्यात आल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले.
Published on: Jun 29, 2023 09:22 PM