Pandharpur | Vitthal Rukmini मंदिर समितीचे अन्नछत्र पुन्हा सुरू, पहिल्याच दिवशी 2000 भाविकांकडून लाभ

| Updated on: Feb 19, 2022 | 4:55 PM

श्री विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरे समिती संचालित अन्नछत्र पुन्हा भाविकांच्या सेवेसाठी सुरू केले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी (Devotees) प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरे समिती संचालित अन्नछत्र पुन्हा भाविकांच्या सेवेसाठी सुरू केले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी (Devotees) प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे. कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे केली 2 वर्षे श्री विठ्ठल रूक्मिणी अन्नछत्र बंद ठेवण्यात आले होते. सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शानासाठी भाविकांची संख्याही वाढत असल्याने संत तुकाराम भवन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंदिरे समितीने अन्नछत्र पुन्हा भाविकांच्या सेवेसाठी सुरू केले आहे. आज पहिल्याच दिवशी 2 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ घेतला असून भाविकांना प्रसाद म्हणून चपाती, भाजी, भात, कोशिंबीर असा प्रसाद या अन्नछत्रामध्ये दिला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.