tv9 Special Report | पवार काका-पुतण्याची गुप्तभेट नेमकी कशासाठी? काँग्रेसचा A…B… आणि C प्लॅन काय?
अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त बैठकीवरून राजकीय तापमान तापलेलं आहे. तर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे. तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात होणाऱ्या भेटींमुळे काँग्रेस, ठाकरे गटात नाराजी आहे.
पनवेल : 17 ऑगस्ट 2023 | अजित पवार हे उपमुख्यमंत्री होत त्यांनी पक्षात उभी फूट पाडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात आणि अजित पवार यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात होते. मात्र अजित पवार यांनी ४५ दिवसात चार वेळी शरद पवार यांची भेट घेतल्याने हे फक्त दाखवण्यासाठी आहे की काय अशी चर्चा सुरू आहेत. तर पवार काका पुतण्यांच्या गुप्त भेटीमुळेही अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. तर यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी तर मोठा दावा केलाय. शरद पवारांना सोबत आणा तरच मुख्यमंत्री करू असं मोदींनीच अजित दादांना म्हटल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. त्यातच शरद पवार यांच्या भूमिकांमुळे आणि काका-पुतण्यांच्या भेटीमुळे मविआवर परिणाम होत आहे. तर काका-पुतण्यांच्या अशा भेटींवर काँग्रेस आणि ठाकरे गटानंही आक्षेप घेतला. तसेच शरद पवार यांना आता मविआतून डच्चू देण्यासह ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्लॅन बी तयार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर इतकचं काय तर आमचा प्लॅन C सुद्धा तयार असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत. तर वडेट्टीवारांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावर हा tv9 Special Report