Imtiaz Jalil : ‘त्यांच्याकडे बहुमत आहे, पण आम्ही..’; वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना

Imtiaz Jalil : ‘त्यांच्याकडे बहुमत आहे, पण आम्ही..’; वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना

| Updated on: Apr 02, 2025 | 12:43 PM

Waqf Amendment Bill 2025 : वक्फ बोर्ड विधेयक आज पुन्हा एकदा संसदेत सादर झालं आहे. त्यावर आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची संपत्ती आहे, असं एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटलं आहे. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास कोर्टात जाऊ असंही त्यांनी म्हंटलं आहे. वक्फ विधेयक आज संसदेत मांडलं जात आहे. वक्फ विधेयकाला याआधी विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा सुधारित वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडलं गेलं आहे. त्यावर चर्चा देखील झाली आहे. त्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची आहे. मुस्लिम लोकांनी दान केलेली ही संपत्ती आहे. सरकारकडे बहुमत असल्याने ते हे बिल पास करून घेतील. मात्र आमची देखील तयारी आहे. बिल पास झालं तर आम्ही कोर्टात जाऊ. कारण आम्हाला अजूनही देशाच्या न्यायप्रणालीवर विश्वास आहे.

Published on: Apr 02, 2025 12:43 PM
Ajit Pawar : ‘नका आणू शाली, हार… मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार…’, बीडमध्ये दादांचं मिश्कील वक्तव्य
Ajit Pawar : लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळणार की नाही? अजितदादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा