आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा; संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला प्रस्थान करणार
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 11 जूनला आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. तर ती 28 जूनला पोहचेल. आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांला भेट होईल. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
पुणे : सकल वरकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 11 जूनला आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. तर ती 28 जूनला पोहचेल. आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांला भेट होईल. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Published on: Apr 13, 2023 08:41 AM