राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा

| Updated on: Apr 20, 2022 | 9:48 AM

राज्या पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पाऊस झाल्यास राज्यातील जनतेला उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. सध्या राज्यात उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे जर अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास याचा मोठा फटका हा पिकांना बसू शकतो, उन्हाळी बाजरीसह ज्वारीच्या पिकाला देखील पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आंब्यांच्या बागांचे देखील नुकसान होऊ शकते.

Mumbai|आग्रीपाडा परिसरातील घराला भीषण आग
नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यात दोन तरुण बुडाले