VIDEO : प्रसूती झालेल्या महिलांना घ्यावा लागतोय ओल्या पोत्यांचा सहारा; कुठं व का होतयं असं?
उद्धट्ट आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळं मात्र गावातील प्रसूती झालेल्या महिलाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे उकाड्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना ओल्या पोत्यांचा सहारा घ्यावा लागत आहे.
वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या अनेक भागात अजूनही पाऊस पोहचलेला नाही. तेथे उन्हाच्या झळा दिवसा बसतातच आता महावितरणच्या भोगळ कारभारामुळे रात्रीही घामाच्या धारा सोसाव्या लागत आहेत. येथील खंडाळा शिंदे गावात तब्बल 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.
दिवसा एक ठिक असतं. पण रात्री लाईटच नसल्याने त्याचा गावकऱ्यांना फटका बसत आहे. येथील गावातील विद्युत ट्रांसफार्मर जळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून सुध्दा महावितरण अधिकारी लक्ष देत नाहीत. तर उलट उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून जात आहेत अशी स्थिती सध्या येथे पहायला मिळत आहे.
सर महावितरणच्या अशा या भोंगळ कारभारामुळं तर अशा उद्धट्ट आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळं मात्र गावातील प्रसूती झालेल्या महिलाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे लाईट नसल्याने उकाड्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना ओल्या पोत्यांचा सहारा घ्यावा लागत आहे. ज्यामुळं आता गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.