वाशिममध्ये आज भाजपचा संकल्प मेळावा, देवेंद्र फडणवीस-चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार

| Updated on: Apr 13, 2023 | 9:43 AM

रिसोड- मालेगाव विधानसभा मतदारसंघात अनंतराव देशमुख यांची जाहीर सभा होणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघात अनंतराव देशमुख हे आज शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पाहा व्हीडिओ...

वाशिम : वाशिममध्ये आज भाजपचा संकल्प मेळावा होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या संकल्प मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. हे दोनही नेते आज वाशिम जिल्ह्यातील रिसोड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज ते रिसोडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. रिसोडमध्ये भाजप कार्यकर्ते शेतकरी, शेतमजूर, मतदारसंघातील विकास कामाच्या दृष्टीने भव्य संकल्प सभा होतेय. काँग्रेसचे माजी खासदार, तथा मंत्री अनंतराव देशमुख यांनी काही पदाधिकाऱ्यासह मुंबईत भाजप मध्ये प्रवेश केला. त्यानंतर रिसोड- मालेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांची जाहीर सभा होणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघात अनंतराव देशमुख हे आज शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशमुख यांचे हजारो कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Published on: Apr 13, 2023 09:43 AM
शिंदेंसह भाजपने धास्ती घेतली, त्यातूनच नागपूरच्या सभेला विरोध; देशमुखांची सडकून टीका
सोलापूरमधील नागणसूर मठाचे महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; कारण काय?