Pune : चार जुलैपासून पुण्यात पाणीकपात
पुणेकरांना आता पाणीकपातीचा सामना कारावा लागणार आहे. येत्या चार जुलैपासून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चार जुलैपासून पुणे शहरात पाणीकपात करण्यात येणार आहे. खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला आहे. पाण्याचा साठा अपुरा असल्याने पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. येत्या दोन दिवसांत पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
Published on: Jul 01, 2022 09:47 AM