जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद

| Updated on: May 24, 2022 | 12:04 PM

पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद आहे. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद आहे. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपींग, एस.एन.डी.टी, वारजे जलकेंद्र, नवीन,जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत व पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीने देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी पुर्णदिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Published on: May 24, 2022 12:04 PM
रावसाहेब दानवेंचा भाजपचा झेंडा हाती घेऊन व्हिडीओ व्हायरल, पहा व्हिडीओ
धावती ट्रेन पकडताना प्रवासी खाली पडला, घटना सीसीटीव्हीत कैद