शिवाजीनगर भागातील पाणी पुरवठा विस्कळीत, पुण्यात ‘नो वॉटर नो वोटचे बॅनर’

| Updated on: Apr 06, 2024 | 12:55 PM

पुण्यातील शिवाजीनगर भागात पाणी पुरवठा विस्कळीत, नागरिकांनी थेट नो वॉटर नो वोट असे बॅनर लावून दिला इशारा. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकणार असा इशारा दिला आहे.

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच काही ठिकाणी प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. प्रत्येक उमेदवार मतदार संघात जावून प्रचार करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील खैरेवाडी या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे तेथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. निवडणुका समोर असतानाच अशा घटना घडत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांनी पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा दिला आहे. तर पुण्यात काही मुख्य मार्गांवर नो वॉटर नो वोट असे बॅनर देखील लावले आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नो वॉटर नो वेट अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

Published on: Apr 06, 2024 12:50 PM
प्रतिक्षा संपली, महायुतीचा कल्याणच्या जागेचा तिढा सुटला, अशी होणार लढत
यंदा कल्याण लोकसभेचं चित्र बदलणार, वैशाली दरेकर नेमकं काय म्हणाल्या?