VIDEO : ‘सत्तेत तीन पार्टनर झाल्यानं विस्तारास विलंब’; शिंदे गटातील मंत्र्याचं सुचक वक्तव्य
याचवेळी याला मुहूर्त मिळाला असतानाच आला विस्ताराला खो बसला आहे. होणारा मंत्रिमंडळ विस्तार हा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला असून तो आता पावसाळी अधिवेशनानंतरच केला जाईल अशी ही माहिती मिळत आहे.
जळगाव : राज्यातील शिदें-फडणवीस-पवार सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असे म्हणत गेले काही दिसत शिंदे गटासह भाजपमधील नेते बोलत आहेत. याचवेळी याला मुहूर्त मिळाला असतानाच आला विस्ताराला खो बसला आहे. होणारा मंत्रिमंडळ विस्तार हा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला असून तो आता पावसाळी अधिवेशनानंतरच केला जाईल अशी ही माहिती मिळत आहे. यावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुचक वक्तव्य करताना, मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र असल्याचं मत पाटलांनी व्यक्त केलंय. मी पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीच मुंबईत थांबलो होतो. परंतु नाशिक जिल्ह्यात घडलेल्या बसच्या अपघातामुळे मला नाईलाजाने तातडीने नाशिक इथे यावं लागलं. त्यानंतर मी नाशिक येथून घरी आलो. आज दुपारी किंवा उद्या सकाळपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मी ऐकतोय, असंही ते म्हणाले. अजित पवारांना अर्थ खातं दिलं जाईल का, या संदर्भात मात्र त्यांनी बोलणं टाळलं.