लोक विस्कळीत, देवही विस्कळीत; गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक विधान?
यावेळी मात्र पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारलाच निशान्यावर घेतलं आहे. गुलाबराव पाटलांनी आम्ही सत्तेत आल्यापासून लोक विस्कळीत आहेत आणि देवही… असं खळबळजनक विधान केलं आहे.
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांनी अजित पवार यांच्याबाबत विधान केलं होतं. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. यावेळी मात्र पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारलाच निशान्यावर घेतलं आहे. गुलाबराव पाटलांनी आम्ही सत्तेत आल्यापासून लोक विस्कळीत आहेत आणि देवही… असं खळबळजनक विधान केलं आहे. जे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चर्मकार समाजाचा मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी, आता हा अवेळी पडणारा पाऊस आहे. त्यामुळे आम्ही तर हे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी मेळावा सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा धागा पकडून गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं. तर आपल्याच सरकारविरोधात असं विधान का केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.