Nagpur | नागपुरातील चार झोनमधील जलकुंभाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार
महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यात पावसाळ्यापुर्वी पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) दुरूस्ती कामे हाती घेतली आहेत. जी कामं अत्यंत महत्त्वाची आहेत अशी काम तात्काळ करण्याचं ठरवलं आहे.
नागपूर – महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यात पावसाळ्यापुर्वी पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) दुरूस्ती कामे हाती घेतली आहेत. जी कामं अत्यंत महत्त्वाची आहेत अशी काम तात्काळ करण्याचं ठरवलं आहे. तसेच अनेक कामं पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना करण शक्य होत नाही अशी काम मान्सून पावसापुर्वी केली जात आहेत. नवीन जलकुंभ उभारण्यात आले आहे, त्या जलकुंभाच्या जोडणी करीता मंगळवारी दिवसभर नागपूरात (Nagpur) पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्रकात पालिकेला सहकार्य करावे असं देखील म्हटलं आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, ठाणे या जिल्ह्यात देखील दुरूस्तीची कामे नुकतीच झाली आहेत.
Published on: May 29, 2022 11:09 AM