Varun Sardesai | आम्ही निवडणुकांसाठी कधीही सज्ज, युवासेनेचे वरुण सरदेसाई यांचा दावा

| Updated on: Sep 10, 2022 | 3:29 PM

Varun Sardesai | आम्ही राज्यात निवडणुकांसाठी कधीही सज्ज असल्याचा दावा युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी केला.

Varun Sardesai | आम्ही राज्यात निवडणुकांसाठी कधीही सज्ज असल्याचा दावा युवासेनेचे (Yuva Sena) वरुण सरदेसाई (Varun Sardesai)यांनी केला आहे. संभाजी ब्रिगेडसोबत मिळून विद्यापीठ निवडणूका ( Election) लढवण्यास सज्ज असल्याचेही ते म्हणाले. ते सध्या सोलापूरच्या दोऱ्यावर आहेत. तुळजापूर येथे भवानीमातेचे दर्शन घेऊन ते मराठवाडा आणि बुलडाणा असे मिळून एकूण 48 विधानसभांचा दौरा करणार आहेत. या प्रत्येक मतदारसंघात जाऊन तिथल्या तरुणांशी संवाद साधण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्र भर दौरे करणार आहेत. त्यांच्या खाद्यांला खादा लावून तरुणांची मोठी फौज यावेळी उभी राहणार असल्याचे ते म्हणाले. या सर्व तरुणांना युवा सेनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

Published on: Sep 10, 2022 03:29 PM
Nitesh Rane | ‘ही तर शिल्लक सेना’, उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा नितेश राणे यांचा पलटवार
Kishori Pednekar | माँ साहेबांच्या जयंतीला शिंदे गटातील एकही आमदार आला नाही, उपनेत्या किशोरी पेडणेकर यांची टीका