आम्हीच खरी शिवसेना, फक्त लोकसभेचा गटनेता बदलला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

| Updated on: Jul 19, 2022 | 7:45 PM

संजय राऊतांचं बोलणं हे दखल घेण्यासारखं नाही. दुसरं कुणी बोललं असत तर ठीक आहे. त्यांच्या बोलण्याची काही दखल घेण्यासारखं नाही, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नवी दिल्लीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, आम्हीच खरी शिवसेना आहोत. आम्ही फक्त लोकसभेचा गटनेता बदलला आहे. विधानसभेत शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळाली. आता लोकसभेतही मिळेल, असं शिंदे यांनी म्हंटलय. सर्व खासदारांना भावना गवळी यांचाच व्हीप लागू होईल. कुठलंही नियमबाह्य काम आम्ही केलं नाही. 15 ते 20 लाख मतदारांमधून खासदार निवडून आले. त्यांचं नेतृत्व करतात. अशा खासदारांनीही बाळासाहेबांच्या विचाराच्या भूमिकेचं स्वागत केलं. दरम्यान, संजय राऊतांचं बोलणं हे दखल घेण्यासारखं नाही. दुसरं कुणी बोललं असत तर ठीक आहे. त्यांच्या बोलण्याची काही दखल घेण्यासारखं नाही, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यासंदर्भात आमचे गटनेते बोलतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Published on: Jul 19, 2022 07:45 PM
युतीबाबत उद्धव ठाकरे आणि मोदींमध्ये चर्चा झाली होती, खासदार शेवाळे यांचा गौप्यस्फोट
भाजपने महाविकास आघाडी शिवसेनेवर लादली, संजय राऊतांचा पलटवार